Monday, January 8, 2018

नका हो तोडू मज...

       

तोडून कचर्‍यामध्ये मज फेकू नका,
सन्मानाने मज जगायचं आहे
नका हो तोडू मज, मलाही फुलायचं आहे

सुर्यासारख तेजस्वी जीवन,
मलाही अनुभवायच आहे
नका हो तोडू मज, मलाही फुलायचं आहे

आकाशातील गरूडझेप पाहून,
कल्पनेतली गगनभरारी सत्यात उतरवायची आहे
नका हो तोडू मज, मलाही फुलायचं आहे

माझ्यात असलेल्या विविध कलागुणांतून,
मलाही प्रतिभावान व्हायचं आहे
नका हो तोडू मज, मलाही फुलायचं आहे

जीवनात येणाऱ्या प्रत्येक वादळाशी,
खंबीरपणे मज लढायचं आहे
नका हो तोडू मज, मलाही फुलायचं आहे

माझ्यात असलेल्या माधुर्याने,
सार्‍या जगाचं मन जिंकायच आहे
नका हो तोडू मज, मलाही फुलायचं आहे

आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखात,
साथ तुमची द्यायची आहे
नका हो तोडू मज,मलाही फुलायचं आहे

राष्ट्रासाठी वीर- विरांगना घडवून,
संस्काररुपी सुगंधातून मज दरवळायचं आहे
नका हो तोडू मज, मलाही फुल व्हायचं आहे


             


#लेक वाचवा लेक शिकवा


प्रमोद ठोंबरे
मो. नं. 9545020097
pramodthombare.blogspot.com






No comments:

Post a Comment

Beautiful butterfly