Wednesday, January 3, 2018

एक ध्यास : राष्ट्रविकास

संकल्प करुया, धर्मनिरपेक्षतेचा
 धर्मनिरपेक्षते सोबतच,  समता, बंधुता, विविधतेतील एकता जपण्याचा

संकल्प करुया, स्त्री-सन्मानाचा
स्त्री-जन्म स्वागताचा, स्त्री रक्षणाचा व स्त्री-पुरुष समानतेचा

संकल्प करुया, स्वच्छतेचा
परिसर स्वच्छतेबरोबर, मन स्वच्छतेचा

संकल्प करुया, सुदृढ आरोग्याचा
उपचाराआधीच्या सुरक्षिततेसोबतच, प्रत्येकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचा

संकल्प करुया, अंधश्रद्धा निर्मूलनाचा
अंधश्रध्देपासून दूर राहून, विज्ञानाच्या सत्यतेत जगण्याचा

संकल्प करुया, प्रदुषणमुक्तीचा
वृक्षारोपणासोबतच ,शुद्ध पर्यावरणनिर्मितीचा

संकल्प करुया , साक्षरतेचा
अनाथ,अस्थायी बालकांपर्यंत पोहचविण्याचा

संकल्प करुया, नव तंत्रज्ञानाचा
तंत्रज्ञान विकासातून ,रोजगार निर्मितीचा

संकल्प करुया, जनसेवेचा
जनसेवेतून भ्रष्टाचार मुक्तीचा

संकल्प करुया, शैक्षणिक विकासाचा
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच, व्यवहारिक व वैचारिक गुणवत्ता विकासाचा

संकल्प करुया, सुरक्षिततेचा
संरक्षणापासून ते राष्ट्रसुरक्षेपर्यंतचा

संकल्प करुया, कृषी विकासाचा
कृषी उत्पन्नातून कुपोषण मुक्तीचा

आणि एक संकल्प असाही करुया, संकल्पाच्या कृतीचा
कृतीतून राष्ट्रविकासाचा





प्रमोद ठोंबरे
मो.नं.-9545020097
pramodthombare.blogspot.com







No comments:

Post a Comment

Beautiful butterfly